Pollution in Dombivli : डोंबिवलीतील कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण; भाजपची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

Pollution: डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण होत असल्याची तक्रार कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्षांनी केलीय.
 Pollution in Dombivli
Pollution in Dombivlisaam Tv
Published On

(अभिजीत देशमुख)

Pollution in Dombivli :

डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योगातून प्रदूषण होत असल्याची तक्रार कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्षांनी केलीय. कल्याण भाजप उप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोन कंपन्यांची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलीय. पाटील यांच्या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलीय. (Latest News)

संबंधित दोन्ही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणचे प्रक्रिया करण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहेत. त्यांचा रिपोर्ट येताच पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

डोंबिवलीतील पियूष आणि जयराज या दोन कापड प्रक्रिया उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली आणि औद्योगिक सुरक्षिततेचे पालन करत नव्हते. या कंपन्या संदर्भात कल्याण भाजप उपाध्यक्ष पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण, औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालय कल्याण, कामगार आयुक्त या चारही विभागांकडे तक्रार केलीय. पियूष आणि जयराज या दोन्ही कंपन्या कापड प्रक्रिया उद्योगाच्या आहेत.

या कंपन्यामध्ये रासायनिक प्रक्रियेकरिता बॉयलरचा वापर केला जातो. त्याकरीता कोळसा जाळला जातो. तसेच प्रक्रियेत सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाणी यावर योग्यप्रकारे प्रक्रिया केली जात नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले जात नाही. याचबरोबर कारखान्यातील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली जात नाहीत. कंपनीत १ हजार कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी ३ टक्के कामगारांनाच आरोग्य कामगार विमा आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ दिला जातो.

उर्वरीत कामगारांना हा लाभ दिला जात नाही. त्यांना १२ तासापेक्षा जास्त राबवून घेतले जाते. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. या विविध तक्रारी पाटील यांनी केल्या आहेत.

 Pollution in Dombivli
Nagar Kalyan Highway News : धनगर आरक्षणासाठी नगर- कल्याण महामार्गावर रास्ता राेकाे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com