Dombivli MIDC Fire Blast Latest Update: Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire : भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली! आसपासच्या कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी; शोरूममधील १० - १२ नव्या कोऱ्या कार जळून खाक|VIDEO

Dombivli MIDC Fire Blast Latest Update: एमआयडीसी परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने डोंबिवली हादरुन गेली आहे. या दुर्घटनेत ३०- ३५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, ता. २३ मे २०२४

एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने डोंबिवली परिसर हादरुन गेला आहे. या स्फोटाची भीषणता इतकी होती की आसपासच्या २- ३ किलोमीटरपर्यंत इमारतींना हादरे बसले. परिसरात धुराचे लोट पसरले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची दाहकता प्रचंड असल्याने आसपासच्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे.

दुपारी दोन वाजताची वेळ. डोंबिवली एमआयडीसीमधील अंबर केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात ३०-३५ जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कंपनीत नक्की किती कामगार आहेत? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

स्फोटानंतर लागलेली आगीची दाहकता प्रचंड असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. तसेच आसपासच्या कंपन्यांपर्यंत ही आग पोहोचल्याने त्या कंपन्यांनाही धोका निर्माण झाला आहे. या केमिकल कंपनीजवळच ह्युंदाई कारचे शोरुम आहे. हे शोरुमही आगीच्या भक्षस्थानी आले. या आगीत कंपनीतील नव्या कोऱ्या १० ते १२ कार जळून खाक झाल्यात.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मनसे आमदार राजू पाटील, खासदार श्रीकांत शिंदे हे घटनास्थळावर पोहोचले आहेत. जखमींना तात्काळ मदत तसेच आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT