Dombivli MIDC Blast Update  Saam Digital
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Blast Update : डोंबिवली MIDC दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट! केमिकल कंपन्यांमधील २ कामगार अद्यापही बेपत्ता

Dombivli MIDC Fire : डोंबिवलीतील कंपन्यांमध्ये काही मानवी अवशेषही सापडले आहेत. या दुर्घटनेसंबंधी आणखी एक अपडेट समोर आली आहे. अमुदान ,कॉसमॉस, आणि सप्तवर्ध या कंपन्यांमध्ये काम करणारे २ कामगार अजूनही बेपत्ता आहेत.

Sandeep Gawade

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत दोन दिवसांपूर्वी रिअॅक्टरमध्ये भीषण स्फोट झाला होता. यात ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ६० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. अमुदान कंपनीसह बाजूच्या दोन कंपन्यांमध्ये काही मानवी अवशेषही सापडले आहेत. या दुर्घटनेसंबंधी आणखी एक अपडेट समोर आली आहे. अमुदान ,कॉसमॉस, आणि सप्तवर्ध या कंपन्यांमध्ये काम करणारे २ कामगार अजूनही बेपत्ता असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये दोन दिवसांपूर्वी रियाक्टरचा भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर परिसरातील तीन कंपन्यांमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले होते. दोन दिवसांपासून या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ तसेच अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या बचावकार्यादरम्यान काल आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. तर काही मानवी अवशेष आढळले आहेत. या अवशेषांची आणि मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

भीषण स्फोटानंतर लागलेल्या भयंकर आगीने डोंबिवली परिसर हादरुन गेला आहे. दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. इमारतींना हादरेही बसले आहेत.

दरम्यान आज या दुर्घटनेसंबंधी आणखी एक अपडेट समोर आली आहे. अमुदान ,कॉसमॉस, आणि सप्तवर्ध या कंपन्यांमध्ये काम करणारे २ कामगार अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. सापडलेल्या मृतदेहांपैकी कॉसमॉस आणि सप्तवर्ध या कंपन्यांमधील प्रत्येकी एका कामगाराचा समावेश आहे. तर ३ मृतदेहांची ओळख पटली आहे. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी त्या कामगारांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साई मंदिरात फोडली दहीहंडी

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT