Dombivli MIDC Fire Update Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी, कामगार विभागाची धक्कादायक माहिती; मृतांची संख्या वाढली

Dombivli MIDC Blast Latest Update in Marathi: डोंबिवलीतील ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीत बॉयलरला परवानगी देण्यात आली नव्हती, अशी माहिती कामगार विभागाने दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत जखमींच्या संख्येसह मृत्यूचा आकडाही वाढला आहे. या भीषण आगीत होरपळून आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यात ६४ लोक जखमी झाले आहेत.

याच प्रकरणी आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीत बॉयलरला परवानगी देण्यात आली नव्हती, अशी माहिती कामगार विभागाने दिली आहे. कामगार विभागाने एक प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

कारखान्याची होणार चौकशी

कामगार विभागाने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, ''डोंबिवलीतील कारखान्यात स्फोट झाला व त्यामुळे लागलेल्या आगीमुळे कारखाना व परिसरातील इतर कारखाने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम शासकीय यंत्रनेद्वारे करण्यात येत आहे. या कारखान्यामध्ये कोणत्याही बॉयलरची नोंदणी भारतीय बाष्पके विनियम, १९५० अंतर्गत या विभागाद्वारे करण्यात आलेली नाही. या कारखान्यात कोणताही नोंदणीकृत बॉयलर कार्यरत नव्हता. कारखान्यातील स्फोटाच्या कारणांबाबतची माहिती सखोल चौकशी अंती देण्यात येईल.''

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याचबाबत आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''डोंबिवली एमआयडीसी येथील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती समजली. या अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली आणि जखमींना लवकरात लवकर आराम पडो ही देवाकडे प्रार्थना.

ते म्हणाले की, ''औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे अपघात हे काळजीचं कारण आहे. फायर ॲाडिट, वेळोवेळी तपासणी आणि सुरक्षेच्या कठोर उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई, चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

Maharashtra News Live Updates: पुण्यात आचारसंहिता भंगाच्या १,२८५ तक्रारी

SCROLL FOR NEXT