दुकानदारांना बोलण्यात गुंतवून पैसे लुटणारा भामटा गजाआड ! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दुकानदारांना बोलण्यात गुंतवून पैसे लुटणारा भामटा गजाआड !

सीसीटीव्हीच्या मदतीने विष्णुनगर पोलिसांनी आरोपी गायकर याला पकडले आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेला असलेल्या ग्लोबल मेडिकल मध्ये आरोपी गिरीश गायकर हा खरेदी करण्याचा बहाण्याने मेडिकल मध्ये गेला व दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवून त्याच्याकडून रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने विष्णुनगर पोलिसांनी आरोपी गायकर याला पकडले आहे.

हे देखिल पहा -

डोंबिवली पश्चिमेत सुभाष रोड येथे असलेल्या ग्लोबल मेडिकल मध्ये मालकास बोलण्यात गुंतवून ठेऊन आरोपी गिरीश हा रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे आणि त्याच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा तपास सुरू केला.

आरोपी हा डोंबिवली पश्चिम येथे असल्याची गुप्त माहिती विष्णुनगर पोलिसांना मिळाली असता त्याठिकाणी जाऊन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता आतापर्यंत ४ ठिकाणी असा प्रकार झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT