Dombivali Saam
मुंबई/पुणे

Dombivali News: शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाकडून मुलाचं अपहरण; कुटुंबीयांकडून मागितली 2,00,00,000 रुपयांची खंडणी, कल्याणमध्ये खळबळ

Police Rescue Kidnapped Child Dombivali News: दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाने ६ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केले. मात्र, पोलिसांनी अवघ्या तीन तासात मुलाला शोधून काढले.

Bhagyashree Kamble

अभिषेक देशमुख, साम टीव्ही

दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकाने त्याच्या साथीदारांसोबत एका ६ वर्षीय मुलाचे अपहरण केले. या प्रकरणी व्यावसायिक वडिलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पथके नेमून मुलाचा शोध घेतला. तसेच आरोपीला अटक केली. ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात घडली आहे. या प्रकरणानंतर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मानपाडा पोलिसांचे आभार मानले.

डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरातील व्यावसायिक महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य भोईर हा शाळेसाठी घरातून सकाळी निघाला होता. यावेळी आरोपींनी कैवल्याचे अपहरण केले. काही वेळानंतर महेश भोईर यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. 'तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मुलगा हवा असल्यास दोन कोटी रुपये द्या', अशी धमकी दिली.

आरोपींनी धमकी दिल्यानंतर महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांना मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच, डीसीपी अतुल झेंडे, डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी पोलिस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथके तयार केली.

मुलाचा शोध सुरु झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलगा कैवल्य याला शहापूरातून शोधून काढले. पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या अपहरण प्रकरणात विरेन पाटील, संजय मढवी आणि अन्य तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. तीन तासांच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच मुलाची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT