DOMBIVLI LIFT DISPUTE TURNS VIOLENT: VIRAL VIDEO OF HOUSING SOCIETY CLASH SPARKS OUTRAGE Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli : लिफ्टवरून दोन गटात तुंबळ हाणामारी,मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dombivli Lift Shutdown Dispute: डोंबिवलीतील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्ट बंद ठेवण्याच्या निर्णयावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीतील एका सोसायटीत लिफ्टच्या वापरावरून दोन गटांमध्ये हाणामारी

  • संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल

  • पोलीस पुढील तपास करत आहेत.

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सोसायटीच्या लिफ्टच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून टिळक नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गृहनिर्माण सोसायटीमध्ये लिफ्टच्या वापरामुळे वीजबिलाचा खर्च वाढत असल्याचा काही रहिवाशांचा आरोप होता. त्यामुळे खर्च कमी करण्याच्या उद्देशाने काही रहिवाशांनी रात्रीच्या वेळी लिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय सर्व रहिवाशांना मान्य नव्हता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या कुटुंबांकडून लिफ्ट सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती.

याच मुद्द्यावरून एका रहिवाशाने लिफ्ट बंद ठेवायला विरोध केला. त्यानंतर संबंधित रहिवासी आणि इतर काही शेजाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला केवळ संवाद सुरु होता. मात्र या संवादाचे रूपांतर वादात रूपांतर झालं आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. संतप्त झालेल्या काही शेजाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

दरम्यान, ही संपूर्ण घटना सोसायटी परिसरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये चित्रित केली. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये काही व्यक्तींमध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की होत असल्याचे दिसत असल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत. सध्या टिळक नगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून व्हायरल व्हिडीओचीही पडताळणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT