Thane Crime Branch investigates alleged contract killing plot targeting Shinde faction leaders in Dombivli. saamtv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांसह मुलाला मारण्याची सुपारी? आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Shinde Group Leaders Contract Killing : शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील आणि पदाधिकारी सुजित नलावडे यांच्यासह महेश पाटील यांच्या मुलाच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची बाब उघडकीस आलीय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप.

  • विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला.

डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आलीय. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील, पदाधिकारी सुजित नलावडे, आणि महेश पाटील यांच्या मुलाची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील आणि सुजित नलावडे यांनी केलाय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात वंडार पाटील आणि मुज्जमिल बुबेरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आलाय.

महेश पाटील यांनी सांगितलं की, "माझ्या, सुजित नलावडे यांच्या आणि माझ्या मुलाच्या हत्येची सुपारी मुज्जमिल बुबेरे या इसमाला देण्यात आली होती." ही माहिती अर्जून देशमुख नावाच्या तरुणाने त्यांना दिली. महेश पाटील यांनी पूर्वी अर्जूनच्या बहिणीच्या एका खाजगी प्रकरणात मदत केली होती. त्या मदतीच्या बदल्यात अर्जूननेच या खून कट उघडकीस आणला. याप्रकरणी एका वृत्तसंस्थेनं वृत्त दिलंय.

दरम्यान या हत्येच्या कटाची एक ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आलीय. यात कथित संभाषण रेकॉर्ड असल्याचे महेश पाटील यांनी सांगितलं. या क्लिपच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केलीय. विष्णूनगर पोलीस ठाण्यात सुपारी देणारे आणि सुपारी घेणारा मुज्जमिल बुबेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय,मात्र अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाहीये, त्यामुळे महेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सवाल उपस्थित केलाय.

आमच्या जीवाला धोका असूनही पोलीस कारवाई करीत नाहीत. सुपारी दिल्याचे स्पष्ट पुरावे असूनही अटक का होत नाही?, असा सवाल यांनी उपस्थित केलाय. हाती आलेल्या माहितीनुसार वंडार पाटील यांनी सुपारी दिलाचा आरोप शिवसेना नेत्यानं केलाय. वंडार पाटील हेही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT