Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : सिगारेट आणली नाही म्हणून मित्राची हत्या; डोंबिवली येथील धक्कादायक प्रकार

ही घटना इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : सिगारेट आणली नाही या कारणावरून मित्राने रागाच्या भरात मारहाण केल्याने मृत्यू झाला. ही घटना ४ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील पेंडसेनगर मधील तुषार इमारतीच्या समोर घडली. या प्रकरणी डोंबिवली (Dombivli) रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शनिवार १२ तारखेला रामनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मित्राला बेड्या ठोकून अटक केली. ही घटना इमारतीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Dombivli Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश्चंद उर्फ बकुळ रामदास चौधरी ( ३२ , रा. ठाकुर्ली ) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुषमा जाधव यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुषमा जाधव यांचा भाऊ जयेश जाधव असे मारहाणीत मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.जयेश आणि हरीश्चंद हे दोघेही मित्र होते.४ तारखेला दोघेही दारू पिण्यासाठी भेटले. दारू पिल्यानंतर हरीश्चंद यांनी जयेशला सिगारेट आणण्यास सांगितले.जयेशने मात्र सिगारेट आणण्यास नकार दिला.

याचा राग आल्याने हरीश्चंदने जयेशला मारहाण केली. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला इजा झाली. काही वेळाने जयेश घरी गेल्यावर झोपला.मात्र सकाळी जयेश झोपेतून उठत नसल्याने घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले.जयेशची बहीण सुषमा हिने रामनगर पोलीस ठाण्यात हरीश्चंद विरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT