Dombivli Crime Update saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले अन्... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Dombivli Crime Update: या प्रकरणी आरोपीविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी....

Dombivli Crime News: डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिसरात एका तरुणाने इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून काशिनाथ पाटील या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीत राहणाऱ्या आरोपी काशिनाथ पाटील याने इंस्टाग्रामवर एका अल्पवयीन मुलीची ओळख वाढवली. त्याने मुलीला आपल्या जाळ्यात ओढत डोंबिवली पश्चिम येथे भेटण्यास बोलवले आणि संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले.

दुपारी गेलेली मुलगी परत घरी परतली नाही म्हणून मुलीच्या कुटूंबियांनी २५ जुलै रोजी ती हरवल्याची तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. यासंदर्भात पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अधिकारी एम.पी. मुंजाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासा दरम्यान, आरोपी काशिनाथ पाटील याला डोंबिवली पश्चिमेतून अटक केली. २९ वर्षीय आरोपी काशिनाथ पाटील हा डोंबिवली पूर्वेत राहणारा असून याच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT