Dombivli Midc Fire  Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Midc Fire : डोंबिवलीच्या एमआयडीसीतील कंपनीत मोठा स्फोट; आगीचं रौद्ररुप, व्हिडिओ बघा

Dombivli Midc Fire update : डोंबिवलीच्या एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोट झालाय. या भीषण स्फोटानंतर कंपनीला आग लागली. या भीषण स्फोटानंतर दोन ते तीन कंपनीला आग लागली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली :

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या स्फोटांनी अख्खं शहर हादरून गेलं. स्फोटाची तीव्रता खूप मोठी होती. त्यामुळं आसपासच्या घरांच्या काचा दणादण फुटल्या. या स्फोटांनंतर आग लागली. आगीनं काही क्षणांतच रौद्ररूप धारण केलं. ही आग बॉयलरच्या स्फोटामुळं लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग इतकी पसरली की तिनं आजूबाजूच्या आणखी तीन कंपन्यांना आपल्या कवेत घेतल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. तर सुरुवातीला पाच ते सहा जण जखमी असल्याची माहिती होती. परंतु, आता हा आकडा वाढल्याची भीती आहे. साधारण ३० ते ३५ कामगार या आगीत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

डोंबिवलीच्या एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोट झालाय. या भीषण स्फोटानंतर कंपनीला आग लागली. या भीषण स्फोटानंतर दोन ते तीन कंपनीला आग लागली आहे. या भीषण स्फोटानंतर परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत काही कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत. या घटनेतील जखमींना डोंबिवलीतील एम्स रग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

कंपनीत भीषण स्फोट, डोंबिवली हादरली

या स्फोटाने डोंबिवली हादरून गेली आहे. भीषण आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात इमारतीमधील घरांच्या काचा फुटल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्यामुळे आगीचं रुप रौद्र असल्याचे समजत आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती होती?

घटनास्थळावरील स्थानिक नागिराकांनी सांगितलं आहे की, 'कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागल्याती प्राथमिक आहे. या आगीमुळे सातत्याने केमिकलचे ड्रम फुटत आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूंच्या घरांचे नुकसान झालं आहे. घराच्या काच्या फुटल्या आहेत. काह घरांचे पत्रे उडाले आहेत. तेथील स्थानिक नागरिाकांनी घरातील सिलिंडर दूर नेल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर नागरिकांची एकच पळापळ झाली. आग लागल्यानंतर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे'.

१० ते १२ गाड्या जळून खाक

घटनास्थळी असलेल्या अमुदान कंपनीला आग लागली. अमुदान कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हुंडाई गाडीच्या शोरूमला आग लागली. या भीषण आगीमुळे कंपनीच्या शोरुममधील 10 ते 12 गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT