Dombivli Politics Heat Up Saam
मुंबई/पुणे

पंतप्रधान मोदींचा 'तो' फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, डोंबिवलीत भाजप आक्रमक; नेमकं प्रकरण काय?

Dombivli Politics Heat Up: डोंबिवलीत काँग्रेस नेत्यानं पंतप्रधानांचा आक्षेपार्ह फोटो केला शेअर. भाजप आक्रमक. पदाधिकाऱ्यांनी दिली तंबी.

Bhagyashree Kamble

  • काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधानांचा आक्षेपार्ह फोटो शेअर.

  • भाजप पदाधिकारी आक्रमक.

  • साडी देत दिली तंबी.

डोंबिवलीतून राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी भाजपनं काँग्रेस नेत्याला सज्जड दम दिला आहे. तसेच त्यांना साडी नेसवली आहे. याचा व्हिडिओ शूट करून समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आला होता. हा फोटोकाँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाले. त्यांनी काँग्रेस नेते मामा पगारे यांची भेट घेतली. तसेच सज्जड दम दिला.

कल्याण जिल्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना साडी दिली. नंतर साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी मामा पगारे यांना सज्जड दम दिला. 'यापुढे आमच्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी केल्यास त्यांची सुद्धा अशीच अवस्था करू', असा थेट इशारा भाजपकडून देण्यात आला.

येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील नेते मंडळींनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अशातच डोंबिवलीत काँग्रेस नेत्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तंबीमुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो फॅटी लिव्हरचा धोका; तज्ज्ञांनी सांगितले उपाय, एकदा वाचाच...

Cars Price Dropped: कारचं स्वप्न होणार पूर्ण; जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर 'या' कंपनीच्या कार झाल्या स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो आणि टँकरचा अपघात

Oxidised Jewellery Look: नवरात्रीचा लूकला करा खास; घागरा चोलीवर ट्राय करा या ट्रेण्डी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

Special Trains: कन्फर्म तिकीट! दिवाळीसाठी १२००० विशेष ट्रेन; प्रत्येक मार्गावर फटाफट मिळतील रेल्वे

SCROLL FOR NEXT