अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा देऊ नका; KDMC आयुक्तांचे महावितरणला पत्र Saam Tv News
मुंबई/पुणे

अनधिकृत बांधकामांना वीजपुरवठा देऊ नका; KDMC आयुक्तांचे महावितरणला पत्र

प्रदीप भणगे

कल्याण : केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामांना विद्युत पुरवठा देऊ नका याबाबतचे पत्र महावितरणला दिले आहे. तसेच यापुढे अनधिकृत बांधकामांना नळ जोडणी मिळणार नाही, जोडणी केल्यास तोडणार असेही साम टीव्हीशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे यावरून स्पष्ट होत आहे की, कल्याण-डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहेत आणि त्याचे रजिस्ट्रेशनसुद्धा केले जात आहे.

हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी कल्याण ग्रामीण भागातील दावडी परिसरात असलेली बेकायदा सहा मजली इमारत केडीएमसीने पाडली. ही इमारत न पाडण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप बिल्डर मुन्ना सिंग यांनी केला होता. इमारत पाडण्यापूर्वी अधिकारी दीपक शिंदे आणि अनंत कदम यांनी प्रत्येकी एक लाख रुपये स्वत:साठी घेतले. तसेच आयुक्तांच्या नावे 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप करीत बिल्डरने अधिकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये चर्चा करीत असल्याचे एक सीसीटीव्ही सादर केले आणि एकच खळबळ उडाली.

याच प्रकरणातबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आणि मनसे आमदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्त पदावरुन दूर करा अशी मागणी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले. मात्र आयुक्तांनी त्या बिल्डरने केलेले आरोप फेटाळले आहेत.

मागील दहा-बारा वर्षात कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येकवर्षी साधारण पाच हजार अनधिकृत बांधकामे उभी राहीली आहेत. अग्यार समितीच्या चौकशीदरम्यान 2007 मध्ये पालिका क्षेत्रात 67 हजार 920 अनधिकृत बांधकामे होती. शहरातील मोकळ्या जमिनी संपल्यानंतर माफियांनी पालिकेचे आरक्षित भूखंड गिळंकृत केले. खाडी, सीआरझेड भागात, महापालिकेच्या विकास आराखडय़ातील रस्त्यांवर चाळी, इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. बेकायदा बांधकामे आणि त्यांच्या चौकशीसाठी नागरिकांकरीता टोल फ्री क्रमांक जाहीर केला. त्यानंतर आयुक्तांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय उपायुक्त ही संकल्पना राबवित पालिकेतील 10 प्रभागांसाठी पाच विभागीय उपायुक्त नेमून त्यांच्याकडे प्रत्येकी दोन प्रभागांची जबाबदारी दिली आहे.

आम्ही आता असा निर्णय घेतलाय अनधिकृत बांधकाम करून कोणी इमारत उभी केली असेल,तर त्याला आम्ही कोणत्याही परिस्थितीत नळ जोडणीची परवानगी देणार नाही आणि दिली असल्यास ती तोडू. अनधिकृत इमारतींना विजेचे कनेक्शन दिले जाते याबाबत आता एम.एस.ई.बी. यांना विनंती केली आहे आणि त्यांना आम्ही तसे पत्र देखील दिले आहे आणि सर्व अनधिकृत बांधकाम होत आहेत आणि झालेले आहेत त्या इमारतीची आम्ही लिस्ट त्यांना दिलेली आहे.
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

दरम्यान मोठमोठ्या इमारतींवरील कारवाईसाठी पालिकेने हाय रीप जॉ क्रशर मशीनही आणले आहे. मात्र ग, ह, ई आणि आय या प्रभागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आज सुद्धा सुरु आहेत. तर आता केडीएमसी आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामाना विद्युत पुरवठा देऊ नका याबाबतचे पत्र महावितरणला दिले आहे आणि यापुढे अनधिकृत बांधकामला नळ जोडणी मिळणार नाही, जोडणी केल्यास तोडणार असेही साम टीव्हीशी बोलताना सांगितले. आजदे गाव, आयरे गाव, कोपर, भोपर, पिसवली, खडेगोळवली, टिटवाळा, मांडा, कल्याण पूर्व आणि 27 गाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT