- सिद्धेश म्हात्रे
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड अर्थात अटल सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन (pm modi to inaugurate mumbai trans harbour link) होणार आहे. या सागरी सेतूवर स्थानिकांना टाेल माफी करावी अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत (congress leader mahendra gharat) यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली आहे. (Maharashtra News)
देशातील सर्वांत मोठा सागरी सेतू असून जगात या सेतूचा १२ वा क्रमांक लागताे. या सेतूवरुन मिनीबस, हलकी वाहने, कार, टॅक्सी, बस आदी वाहनांना वाहतुकीस परवानगी असणार आहे. त्यासाठी वाहनधारकांकडून टाेल आकारणी केली जाणार आहे.
यामध्ये एकेरी 250 रुपये तर दुहेरी 375 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दरम्यान या टाेल आकारणीपासून स्थानिकांना सूट द्यावी अशी मागणी काॅंग्रेसकडून करण्यात येत आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले या सागरी सेतू उभारण्यासाठी उरण पनवेल तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या मार्गाच्या 10 किलोमीटर परीघातील नागरिकांना टोल माफी मिळाली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करणार आहाेत असेही काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.