Kalyan Latest Marathi News Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

जय महाराष्ट्र! तिकिट कापलं म्हणून थेट मनसेच्या ऑफिसला ठोकलं कुलूप, संतप्त होत म्हणाले...

MNS internal conflict Latest Marathi News : कल्याणमध्ये उमेदवारी नाकारल्याने मनसेतील अंतर्गत असंतोष उफाळला आहे. उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडे यांनी पक्षावर गंभीर आरोप करत नांदीवली येथील मनसे कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी, कल्याण

Dnyaneshwar Pavde MNS resignation : उमेदवारी नाकारल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. कल्याणमध्ये उमेदवारी नाकारल्याने मनसेचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. "मुलांची शाळेची फी भरली नाही, पण शाखेचे भाडे न चुकता भरले; मात्र पक्ष आता आर्थिक निकषांवर उमेदवारी देत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला. नाराजीतून त्यांनी नांदीवली येथील मनसे कार्यालय बंद करत आपला संताप व्यक्त केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. (MNS leader resigns after ticket denial in Kalyan)

ज्ञानेश्वर पावडे यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केल्याचा दावा करत, पक्षवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. संघटनात्मक कामे केली असल्याचे सांगितले. मात्र उमेदवारी देताना कार्यकर्त्याच्या कामगिरीऐवजी आर्थिक निकष लावले गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी वरिष्ठ नेतृत्वावर केला आहे. पैसे नाहीत म्हणून मला उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याचे खच्चीकरण होत आहे,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी आपल्या व्यथा मांडताना भावनिक प्रतिक्रिया दिली. एक वेळ अशी आली की मुलांच्या शाळेची फी भरू शकलो नाही, पण शाखेचं भाडं मात्र वेळेवर भरलं,असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला. पक्षासाठी केलेल्या त्यागाची दखल न घेतल्याने आपण पक्षापासून फारकत घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर ज्ञानेश्वर पावडे यांनी नांदीवलीतील मनसे कार्यालय बंद करत पक्षाशी संबंध तोडल्याची घोषणा केली. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडींमुळे मनसे नेतृत्व या नाराजीची दखल घेणार का, आणि पक्षातील अंतर्गत असंतोषावर कसा तोडगा काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ticket Refund : रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

Fry Pineapple Recipe: आंबट-गोड अननस फ्राय कसं बनवायचं? बघताच क्षणी तोंडाला येईल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT