Ulhasnagar Saam
मुंबई/पुणे

Ulhasnagar: "ए डीजेवाल्या गाणं लाव" हळदीत डीजे वेळेत बंद केल्यामुळे वाद; DJ ऑपरेटरच्या डोक्यात दगडच घातला

DJ Operator Hospitalized After Being Beaten by Group: उल्हासनगरमधील कुर्ला कॅम्प परिसरात हळदीच्या कार्यक्रमात डीजे वेळेवर बंद केल्याच्या रागातून डीजे ऑपरेटरवर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

अजय दुधाणे, साम टीव्ही

हळदीच्या कार्यक्रमात डीजे वेळेत बंद केल्याच्या रागातून टोळक्यानं डीजे ऑपरेटरवर हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेम राजबोईना असं या हल्ल्यात जखमी झालेल्या डीजे ऑपरेटरचं नाव आहे. हा हळदीचा कार्यक्रम कॅम्प नंबर ५ च्या कुर्ला कॅम्प परिसरात १८ एप्रिल पार पडला. या हळदीच्या कार्यक्रमात डीजे ऑपरेटर म्हणून प्रेम गेला होता. त्याच हळदीत साहिल म्हस्के, प्रतीक क्षेत्रे आणि चेतन घाटविसावे हे तरुण नाचत होते. नियमानुसार रात्री १० वाजता डीजे ऑपरेटर प्रेम याने डीजे बंद केला.

यावेळेस डीजे पुन्हा चालू करण्यासाठी साहिल याने हुज्जत घातली. तसेच प्रेमला पुन्हा डीजे चालवण्यासाठी दबाव टाकला. मात्र, प्रेमने डीजे चालवण्यास नकार दिला. प्रेमने साहिलला डीजे चालू करण्याला नकार दिल्यानंतर साहिलला राग अनावर झाला. त्याने त्याने प्रतीक आणि चेतनच्या मदतीने डीजे ऑपरेटर प्रेम राजबोईना याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.

मारहाण केल्यानंतर त्याने प्रेमच्या डोक्यात दगडाने वार केला. यात प्रेमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने शासकीय रूग्णलयात दाखल करण्यात आले. तसेच डोक्याला १५ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची लटकलेली चरबी सांगेल शरीरातली 'ही' कमजोरी

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

SCROLL FOR NEXT