Dry Fruits x
मुंबई/पुणे

Dry Fruits Price : दिवाळीचा सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

Dry Fruits Price Update : अर्थ मंत्रालयाकडून जीएसटीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे दिवाळसणाच्या वेळेस सुकामेव्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • दिवाळी सणाच्या वेळेस सुकामेव्याची लज्जत

  • जीएसच्या बदलांमुळे सुकामेव्याच्या दरात घट

  • आधी आणि आताचे दर, जाणून घ्या...

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Diwali Dry Fruit : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरात फराळ तयार केला जातो. ज्यांना घरी फराळ बनवणे शक्य नसते असे काहीजण बाहेरुन फराळ खरेदी करतात. या फराळामध्ये काजू, बदाम अशा सुकामेव्याचा वापर केला जातो. दिवाळीला गिफ्ट म्हणूनही सुकामेवा दिला जातो. या सुकामेव्याच्या दरात घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे दिवाळी सणाच्या वेळेस सुकामेव्याची लज्जत येणार असल्याचे म्हटले जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू आणि सेवा कर यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली होती. जीएसटी कमी झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये आणि प्रदेशातून आयात होणाऱ्या सुकामेव्यावर मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी १,००० रुपयांच्या सुक्यामेव्यावर १२० रुपये जीएसटी द्यावा लागत असे, आता त्यावर फक्त ५० रुपये द्यावे लागतील.

घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर:

बदाम

पूर्वीचे दर : ९०० ते ११००

सध्याचे दर : ७५० ते ९००

जर्दाळू

पूर्वीचे दर : ५०० ते ८००

सध्याचे दर : ४०० ते ६००

अंजीर

पूर्वीचे दर : १५०० ते १८००

सध्याचे दर : १२०० ते १६००

खारा पिस्ता

पूर्वीचे दर : १२०० ते १४००

सध्याचे दर : १००० ते १२००

खारीक

पूर्वीचे दर : २५० ते ४००

सध्याचे दर : २०० ते ३००

खजूर मध्यम

पूर्वीचे दर : १५० ते ४००

सध्याचे दर : १२० ते ३५०

अर्थमंत्रालयाने जीएसमध्ये केलेल्या बदलांमुळे सुकामेव्याच्या दरांवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुक्यामेव्याचे दर हे तब्बल २० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ड्रायफ्रूट असोसिएशनने व्यक्त केला आहे. यामुळे दिवाळीच्या वेळेस सुकामेव्याची लज्जत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : बारामतीत सोन्याचे भावाने ओलांडला सव्वा लाख रुपयाचा टप्पा

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT