मुंबई डबेवाल्यांन मोफत सायकल वाटप... सुशांत सावंत
मुंबई/पुणे

मुंबई डबेवाल्यांन मोफत सायकल वाटप...

पहिल्या टप्प्यात अंधेरी- जोगेश्वरी भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - जागतिक महामारी कोरोनाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला होता. यातच हातावर पोट असणारे मुंबईचे डबेवाले देखील भरडले गेले. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर डबेवाल्यांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सायकल एचएसबीसी बँकेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अंधेरी- जोगेश्वरी भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे देखील पहा -

हा कार्यक्रम आज रविवारी जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या पटांगणात पार पडला. पुढील आठवडाभरात संपूर्ण मुंबईतील डबेवाल्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.कोरोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मुंबईचा डबेवाल्यावर देखील उपासमारीची वेळ आली होती.

असंघटित कामगार असणाऱ्या या डबेवाल्यांना विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून राशन किटचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.यातूनच मुंबई डबेवाल्यांना राशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी टॅब आणि डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा यासाठी नव्या सायकली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शिवाय मुंबई डबेवाल्यांना मोबाईल देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT