Sharad Pawar And Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Assembly Elections: ठाकरे - शरद पवार गटात जागावाटपावरून तिढा? 20 जागांवर अडकली मविआची गाडी? मुंबईतल्या बैठकीत काय झाली चर्चा?

MVA Seat Sharing 2024: महाविकास आघाडीच्या पक्षांची आज जागावाटप संदर्भात मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटात 20 जागांवर तिढा निर्माण झाला आहे.

Satish Kengar

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कमला लागली आहे. यातच आज मुंबईमधील बीकेसीच्या सोफीटेल हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये बैठक पार पडली. जागावाटप संदर्भात या दोन पक्षांमध्ये आजची ही बैठक पार पडली. या दोन्ही पक्षांमध्ये 15 ते 20 जागांवर तिढा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील 15 ते 20 जागा आशा आहेत, ज्यामध्ये दोन्ही पक्ष आग्रही आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) ज्या जागा एकमेकांच्या विरोधात लढले होते, अशा काही जागांवर तिढा आहे. यामध्ये 15 ते 20 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. यावर सविस्तर चर्चा होऊन, दोन पक्षाचा दावा असलेल्या जागांवरील तिढा सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काँग्रेसची बैठकीला दांडी

मविआच्या आजच्या बैठकीत काँग्रेस पक्ष हजार नव्हता. यावरच भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्ष आजकाल अधिक व्यस्त असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

काँग्रेस नेते 10-10 दिवस वेळ देत नाहीत. पण तारीख पे तारीख देतात. ते लोक कितीही व्यस्त असले तरी आम्ही त्यांना बोलावलं आहे. जागा वाटपाचा प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही पुढील तीन दिवस या मुद्दावर बसून चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले.

काँग्रेसला 125 जागा हव्या?

दरम्यान, काँग्रेसला विधानसभेसाठी 125 जागा हव्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात काँग्रेस सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणार हे निश्चित असल्यानं जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता किमान 125 जागा लढू द्या, अशी भूमिका कॉंग्रेसनं घेतलीय. काँग्रेसच्या एक बड्या नेत्यानं साम टीव्हीला ही माहिती दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divyang Kalyan Yojana: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना मिळणार १५,००० रुपये

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Rajasthan: बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना, मातीचा ढिगारा कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Sunidhi Chauhan: सुनिधी चौहान Live कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना अचानक रडू लागली, नेमकं काय घडलं?

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

SCROLL FOR NEXT