दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालीय.... मुंबईतील ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याच्या बाहेर 19 सप्टेंबरला हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला... एकीकडे दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे स्वतः वकिलांच्या टीमसह आदित्य ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी मातोश्री बाहेर पोहचले... तर दुसरीकडे, ठाकरेसेनेच्या दोन वकीलांनी नोटीस स्वीकारण्यासाठी मातोश्रीवर मुख्य गेटवरच तैनात होते... त्यावेळी माध्यमांच्या गराड्यात मातोश्रीकडे येणाऱ्या सतीश सालियन यांना हे पॉलिटीकल स्टंट असल्याच्या आरोपांबद्दल विचारताच, सतीश सालियन यांनी काय उत्तर दिलं...ऐका....
सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर तिथे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं... मात्र शिवसैनिकांनीही मातोश्रीबाहेर गर्दी केली आणि या ड्रामावर संताप व्यक्त केला. अखेर आदित्य़ ठाकरेंच्या वकीलांनी ओझा यांच्याकडून ५०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस स्वीकारली...
आमदार आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सालियन यांनी अब्रुनुकसानीचा दावा का ठोकला..पाहूयात..
सतीश सालियन यांनी न्यायलयात दिशाच्या मृत्यूच्या पुनर्तपासाची मागणी केली होती
त्य़ानंतर आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सतीश सालियन यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
सतीश सालियन यांनी 'राजकीय हेतूने प्रेरित होऊन पुन्हा एकदा पुनर्तपासाची मागणी केल्याची टीका ठाकरे आणि देशमुखांनी केली. त्यामुळेच त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आलाय...
दुसरीकडे पत्रव्य़वहाराऐवजी थेट घराजवळ जाऊन नोटीस देण्याच्या याप्रकरणानंतर ओझांसह सालियन यांच्यावर ठाकरेसेनेनं चांगलीच टीका केलीय...मुळात दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाला 6 वर्ष पूर्ण झालेत... अशातच दिशाच्या वडीलांच्या जबाबानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सप्टेंबर 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे 6 वर्षांनंतर हे प्रकरण अधिकृतपणे पुन्हा तपासासाठी समोर आलयं..आधीच आदित्य ठाकरेंवर दिशा प्रकरणावरून सत्ताधारी अनेकदा आरोप करताना दिसतात... त्यातच सतीश सालियन यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आदित्य ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढवण्याचा प्रयत्न केलाय...मात्र आता ठाकरेंचे वकील सालियन यांच्या या नोटीशीला काय उत्तर देतात? आणि दिशा प्रकरण काय वळण घेणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.