Disha Salian Case Saam Tv
मुंबई/पुणे

Disha Salian Case: नितेश राणेंकडून अटकेची मागणी, आदित्य ठाकरे म्हणाले - 'कोर्टात उत्तर देऊ'; दिशा सालियन प्रकरणावरून राजकारण तापलं

Aditya Thackeray And Nitesh Rane: दिशा सालियन प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली. या प्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Priya More

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राजकारण पुन्हा तापले आहे. याप्रकरणावर पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली असून यामध्ये आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर देखील जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. '५ वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे.', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. प्रकरण कोर्टात आहे तर कोर्टात बोलू. महत्त्वाची गोष्ट हिच आहे की आम्ही आणि खास करून माझे ट्वीट आहे की आम्ही या सरकारला एका अधिवेशनात एक्सपोज केले आहे. फक्त आम्हीच नाही तर संघानेही एक्सपोज केले आहे. काल संघातील लोकंही बोलले की औरंगजेबाचा मुद्दा चुकीचा आहे. मग आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार का? आज आम्ही एकच प्रश्न विचारत आहोत की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे.'

तर दिशा सालियन प्रकरणावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. 'दिशा सालियनच्या वडिलांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. दिशा सालियनच्या वडिलांनी माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो न्याय लागतो तो या तिघांवर लावावा अशी मागणी आम्ही केली आहे.', असे नितेश राणे म्हणाले.

तसंच, 'कोणावर विनयभंग, बलात्काराचा आरोप झाला तर पहिलं त्याला अटक करावी लागले आणि त्याची चौकशी करावी लागते. त्यामुळे दिशाच्या वडिलांनी ज्या तिघांची नाव घेतली त्यांना देखील अटक करून त्यांची चौकशी करावी. देश कायद्याने चालतो. कायद्यानुसार उर्वरित लोकांना एक कायदा लावत असाल आणि एका व्यक्तीसाठी कायदा मोडत असाल तर ते चूक आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षा देणं आमचे काम आहे. चित्रपटात शक्ती कपूर जसे असतात ते इकडे तिकडे कलानगरमध्ये फिरत असतील तर त्यांना तात्काळ अटक करावी.', अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची 6 तारखेला भेट होणार

मुलासमोरच पत्नीनं पोलीस कॉन्स्टेबलला संपवलं, स्वत:ही आयुष्याचा दोर कापला; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

Hansika Motwani-Sohael Kathuria : मैत्रिणीच्या नवऱ्याशी केलं लग्न, ३ वर्षांतच अभिनेत्रीवर आली घटस्फोटाची वेळ

Ladki Bahin Yojana Scheme : निवडणुकीपूर्वी पात्र, आता अपात्र कसं? लाडक्या बहिणीचा सरकारला संतप्त सवाल

Petrol Diesel Price: खुशखबर! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT