मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आरपारचा नारा देत हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघालेत. सरकारची धडकी भरवणारं मराठा समाजाचं हे वादळ मुंबईच्या दिशेनं निघालंय..मात्र सरकार आंदोलनात आडकाठी आणत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
दरम्यान उच्च न्यायालयाने मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अटीशर्तींसह परवानगी दिलीय... न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या आहेत?
उच्च न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी दिलीय..सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच आंदोलन करता येणार आहे..विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे येत असताना आझाद मैदानावर केवळ मुख्य आंदोलकासह 5 हजार जणांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलीय..शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय... यात परवानगीशिवाय स्पीकर वापरण्यासही बंधन घालण्यात आलंय
न्यायालयाने 1 दिवसाचीच परवानगी दिली असली तरी त्यावर मनोज जरांगेंनी असमाधान व्यक्त केलंय. दुसरीकडे शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारने मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्याची विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय..
मनोज जरांगे अहिल्यानगरमार्गे शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम करणार आहेत.. तर त्यानंतर लोणावळामार्गे आझाद मैदानावर पोहचणार आहेत.. त्यामुळे जरांगेंच्या या आंदोलनादरम्यानच सरकार मागण्यांवर तोडगा काढणार की जरांगे भगव्या वादळासह आझाद मैदानावरच्या उपोषणानंतरच गुलाल उधळून आंदोलन मागे घेतलं जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.