Aaditya Thackeray, Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. दिशाचे वकील नितेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली आणि दिनो मोर्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. ओझा यांनी दावा केला आहे की दिशाच्या मृत्यूप्रकरणात खून आणि सामूहिक बलात्कार लपवण्यासाठी खोटे पुरावे रचण्यात आले. त्यामुळे त्यांनी या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांची अटक आणि नार्को टेस्टची मागणी केली आहे.
दिशा सालियन यांच्या (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप करत दिशा सालियनच्या (Disha Salian Case) आई वडिलांनी हायकोर्टात (Court) याचिका दाखल केलीय. या याचिकेत आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सुरज पांचाल यांचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आला आहे. सतिश सालियन (Disha Salian Case) यांची केस लढत असलेले वकील नितेश ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला आहे. दिशाच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करा, असे ओझा यांनी म्हटले आहे. वकिलाने आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा केला आहे.
आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यांवर ओझा यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याशिवाय त्यावेळचे तपास आधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले. दिशा सालियन प्रकरणात खून, सामूहिक बलात्कार लपवण्यासाठी खोटे पुरावे रचले. हे सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे, त्या सर्वांना अटक करण्यात यावी. त्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण आहे तरी काय ?
दिशा सालियन हिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईत झाला.
दिशा सालियन हिचा बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला.
पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली.
दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा राणेंनी आरोप केला.
मुंबईतील एका पार्टीमध्ये दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला.
कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काय?
8 जून 2020 रोजी दिशा सालियानच्या मालाडच्या घरी पार्टी
पार्टी सुरु असताना ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोरियाची अनपेक्षितपणे एण्ट्री
दिशाचा सामुहिक बलात्कार
प्रकरण दाबण्यासाठी दिशाची हत्या
पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळण्यात आला
फोरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले
प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन
किशोरी पेडणेकरांनी आमची दिशाभूल करुन नजरकैदेत ठेवलं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.