MNS Raju Patil
MNS Raju Patil Saam Tv
मुंबई/पुणे

मनसे आमदार राजू पाटील 'नॉट रिचेबल'; राज्यसभेसाठी मनसेचे मत कोणाला?

प्रदीप भणगे

डोंबिवली : राज्यसभा निवडणुकीसाठीच्या (Election) सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की, ठाणे मधील शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांना संपर्क केला असता झाला, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. दरम्यान मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) हे नॉट रिचेबल झाले आहेत.

मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप (BJP) - मनसे नेत्यांच्या जवळीक वाढल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतलेला दिसला होता. तर दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांचेसुद्धा संबंध चांगले आहेत, असे असेल तरी कल्याण लोकसभेचे खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजप आणि मनसेला (MNS) खिंडार पाडले आहे. राज्यात केडीएमसी ही एकमेव पालिका होती, जिथे दोन आकडी नगरसेवक मनसेचे होते. दरम्यान महापालिका निवडणूक जवळ आली असल्याने, शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली, तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना संपर्क केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते नॉट रीचेबल आहेत. त्यामुळे ते कोणाला मतदान करणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT