Ajit Pawar And Jayant Patil News Saam TV
मुंबई/पुणे

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा; कोणाची लागणार वर्णी?

विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रीवादीचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

अशातच विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रीवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. पाटील म्हणाले, शिवसेने खालोखाल राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. मात्र, सेनेतील ३९ आमदारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग स्वीकारला आहे. आता ते विरोधी बाकावर बसले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडील संख्याबळ पाहता आमचाच विरोधी पक्षनेता होईल असं पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

याआधी देखील 'राष्ट्रवादीकडे आकडे जास्त आहेत त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे असू शकतं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते पदाबद्दल आमच्या नेत्यांची चर्चा झाली असेल, पण आकडे राष्ट्रवादीकडे जास्त आहेत. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत बघायचं झालं तर विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे असू शकतं असंही रोहित म्हणाले होते.

दरम्यान, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित असून या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा होणार आहे.

तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळतं आहे. त्यामुळे आता विरोधकांकडील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या विरोधीपक्षनेतेपदावर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT