Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : "मी पोलिस अधिकारी बोलतोय..." मुंबईतील तरुणीची क्रिकेटरकडून फसवणूक, ३२ लाख उकळले

Mumbai Crime News : “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून मुंबईतील 21 वर्षीय तरुणीची तब्बल 32.69 लाखांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात गुजरातमधून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ३२ लाखांची फसवणूक

  • गुजरातमधून तीन आरोपी अटकेत; एकूण ७ जण ताब्यात

  • बनावट कागदपत्रे व व्हिडिओ कॉलचा वापर

  • सायबर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

संजय गडदे, मुंबई

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका २१ वर्षांच्या तरुणीची तब्बल ३२ लाख ६९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात उत्तर प्रादेशिक सायबर सेलने गुजरातमधून तीन आरोपींना अटक केली असून याआधी अटक झालेल्या आरोपींसह एकूण संख्या आता ७ झाली आहे. ऋषी तुषार आरोटे, हर्ष दिलीप पांचाळ आणि निखिल केशवराम तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून तिघेही गुजरात चे रहिवासी आहेत विशेष म्हणजे ऋषी आरोटे हा अंडर नाईन्टीन रणजी क्रिकेट खेळाडू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथे राहणारी २१ वर्षांची तरुणी एका खाजगी कंपनीत आर्टिस्ट म्हणून काम करते. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तिच्या आजीच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला दिल्ली पोलीस मुख्यालयातील अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने तरुणीवर पुलवामा हल्ल्यातील आरोपी अफजल खानशी संबंध असल्याचा आणि देशविरोधी माहिती शेअर केल्याचा खोटा आरोप केला.

फोन करणाऱ्यांनी तरुणीला व्हिडिओ कॉलवर ठेवून ती “डिजिटल अरेस्ट” मध्ये असल्याचे सांगितले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही काही सांगू नका अशी धमकी दिली. तिला घाबरवण्यासाठी आरोपींनी बनावट FIR, अरेस्ट वॉरंट, CBI, RBI आणि मुंबई पोलिसांचे बनावट लेटरहेड, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या अशी कागदपत्रे पाठवली. आरोपींनी तिच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि चौकशीसाठी पैसे ट्रान्सफर करावे लागतील असे सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत मिळतील असेही सांगितले.

भीतीमुळे तरुणीने ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३२,६९,९९७ रुपये ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर आरोपी आणखी पैशांची मागणी करू लागले. तेव्हा तिला फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर तिने उत्तर प्रादेशिक सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी आधी नांदेड येथून चार आरोपींना अटक केली. पुढील तपासात गुजरातमधील वडोदरा येथून ऋषी आरोटे, हर्ष पांचाळ आणि निखिल तिवारी यांना अटक करण्यात आली.

ऋषी आरोटे हा अंडर-१९ क्रिकेट खेळाडू होता. त्याचे वडील क्रिकेट कोच आहेत. गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत. सायबर गँगला बँक खाती पुरवण्याचे काम तो करत होता. या खात्यांमधून फसवणुकीचे पैसे जमा केले जात होते. अटक आरोपींना मुंबईतील बोरीवली कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलीस, CBI किंवा RBI कधीही फोनवर पैसे मागत नाहीत. “डिजिटल अरेस्ट” नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नाही. अशा धमकीच्या कॉलवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

Crispy Poha Vade Recipe: कांदापोहे खाऊ कंटाळा आला? मग सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा वडे, सोपी आहे रेसिपी

IPL Point Table: पावसामुळे IPLच्या पॉईंट्स टेबलवर मोठी उलटफेर; कोणत्या संघाचं बिघडलं गणित? कोण-कोणत्या संघाच्या पॉईंट्सवर फेरलं पाणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा; माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT