Aaditya Thackeray On Dhananjay Munde Resigns saam tv
मुंबई/पुणे

Dhananjay Munde Resigns : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सरकार बरखास्तीची मागणी

Aaditya Thackeray On Dhananjay Munde Resigns : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी थेट सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Nandkumar Joshi

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचे फोटो समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला. सर्व स्तरांतून तीव्र संतापाची लाट पसरली. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे आणि मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला. अखेर धनंजय मुंडे यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मुंडेंनी आपल्या स्वीय सहायकाच्या मार्फत हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. हा राजीनामा त्यांनी स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.

या सर्व घटनेवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या वेळचे फोटो आधी बाहेर आले नव्हते का? असा सवाल करतानाच हे सरकारच बरखास्त केले पाहिजे. आपल्याच कार्यकर्त्याला हे न्याय देऊ शकत नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. तो पुढील कार्यवाहीकरिता राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून पदावरून मुक्त करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT