Dhanshri Shintre
धनंजय मुंडे सध्या एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीवरही चर्चा होत आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.
वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची जोरदार मागणी समोर येत आहे.
धनंजय मुंडेंवर चार गुन्हे दाखल आहेत, ज्यात एक मुंबईत आणि तीन बीडमध्ये आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊयात.
धनंजय मुंडेंनी प्रतिज्ञापत्रात सांगितले की, त्यांच्याकडे 7 लाख 40 हजारांची रोख रक्कम होती. नातेवाईकांकडे साडेसात लाखांपेक्षा अधिक रोकड असल्याने एकूण रोकड 14 लाख 95 हजार झाली.
धनंजय मुंडेच्या 16 बँक खात्यांवर एकूण 40 लाखांहून अधिक रक्कम असल्याचं समोर आलं आहे.
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे बँक खात्यांमध्ये एकूण 1 कोटी 62 लाख 35 हजारांहून अधिक संपत्ती आहे.
धनंजय मुंडे आणि कुटुंबियांच्या नावावर 2 कोटी 35 लाखांहून अधिक शेअर्स आणि बॉण्ड्स आहेत. एलआयसीमध्ये 16 लाखांचा विमा आहे.
धनंजय मुंडेच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक विमा पॉलिसी असून, एकूण 47 लाख 18 हजारांहून अधिक विमा रक्कम आहे.
धनंजय मुंडेची स्थावर मालमत्ता 14 कोटी 92 लाखांची असून, कुटुंबाची स्थावर मालमत्ता 33 कोटींहून अधिक आहे.