Sitaram Kunte To ED Saam Tv
मुंबई/पुणे

Sitaram Kunte: "...त्यावेळी डीजीपींनी मुख्यमंत्र्यांना कोणतेही उत्तर दिले नाही" - सीताराम कुंटेंचा ईडीसमोर खुलासा

सूरज सावंत

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस बदलीबाबत (Police Transfer) तत्कालीन SID प्रमुखांनी दिलेल्या अहवालावर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Vikas Aghadi Government) कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला होता. तथापि, सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला (ED) आपल्या निवेदनात सांगितले की, त्यावेळी डीजीपींनी मुख्यमंत्र्यांना कोणतेही उत्तर दिले नव्हते. ("At that time, the DGP did not give any answer to the Chief Minister" - Sitaram Kunte's revelation to the ED)

हे देखील पहा -

ईडीला दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांनी सांगितले की, जुलै २०२० मध्ये, तत्कालीन एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली, पोस्टिंगमध्ये कुणीतरी मध्यस्ती करत असल्याने हे फोन कॉल्स रेकाॅर्ड केले होते. त्यानंतर शुक्ला यांनी त्या कॉल रेकाॅर्डच्या आधारे अहवाल तयार केला आणि तो DGP सुबोध जैस्वाल (Subodh Jaiswal) यांना पाठवण्यात आला, त्यानंतर सुबोध जयस्वाल यांनी तो अहवाल कुंटे यांना २७ ऑगस्टला पाठवला. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा अहवाल जेव्हा पाठवण्यात आला तेव्हा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे कोणतीही कारवाई अथवा बदली झाली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 28 सप्टेंबर रोजी सुबोध जयस्वाल यांना पत्र पाठवण्यात आले, ज्यामध्ये अहवालात नमूद केलेल्या बाबी सरकारने गांभीर्याने घेतल्याचे लिहिले होते. त्या पत्रात डीजीपींना असेही सांगण्यात आले होते की, त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करायची याबाबत पुराव्यासह त्यांचा प्रस्ताव पाठवावा. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेचे पत्र असूनही डीजीपी कार्यालयाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे कुंटे यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात या अहवालाच्या आधारे सरकारवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर मार्च 2021 मध्ये मुख्यमंत्र्यांनी मला अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितले होते. आणि मग 25 मार्च रोजी मी एक तथ्यात्मक अहवाल दिला अशी माहिती सिताराम कुंटे यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT