Rahul Shewale presents Devgad Hapus mangoes to Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan while discussing AI-based farming solutions. saam tv
मुंबई/पुणे

कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे हापूससाठी मोठी मागणी; स्कॅनिंग मशीनवर अनुदान द्या

AI Based Mango Quality Scanning Machine Subsidy India: देवगड हापूस आंब्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी एआय आधारित स्कॅनिंग मशीनवर अनुदान देण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

कोकणातील प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, आंबा उत्पादन क्षेत्रात नवे प्रयोग सुरू झाले आहेत. पुण्यातील प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची भेट घेत देवगड हापूस आंब्याची पेटी भेट दिली. यावेळी त्यांनी कोकणातील आंबा उत्पादकांच्या विविध समस्या आणि मागण्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या. राहुल शेवाळे यांनी तीन वर्षांपूर्वी कोकणावरील प्रेमातून देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी केली. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन त्यांनी AI आधारित तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर सुरू केला आहे. यामुळे आंब्याची गुणवत्ता, उत्पादन व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न होत आहे.

आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली. सध्या या मशीनची किंमत ४० ते ५० लाख रुपये असल्याने सामान्य शेतकऱ्यांना ती खरेदी करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच देवगड हापूसमध्ये वाढत चाललेल्या ‘साका’ समस्येवर सखोल संशोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आंबा उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास जागतिक बाजारपेठेत देवगड हापूसची गुणवत्ता आणि मागणी आणखी वाढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राहुल शेवाळे यांना दिल्लीमध्ये सविस्तर चर्चेसाठी निमंत्रित करत सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे उपस्थित होते. पारंपरिक कोकणी हापूस आणि आधुनिक AI टेक्नॉलॉजी यांची सांगड भविष्यात देवगड हापूसला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेवाळे यांच्या मागणीला केंद्रीय कृषि मंत्र्यांनी देखील सकारत्मक भूमिका दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arm Fat Loss Tips: नो जिम, नो डाएट! दंडावरची चरबी कमी करण्यासाठी वापरा 'या' ५ सोप्या ट्रिक

Maharashtra News Live Update : खाजगी लक्झरी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Shocking : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये शिक्षक विद्यार्थिनीसोबत नको त्या अवस्थेत, तरुणांनी व्हिडिओ काढला अन्...

Mumbai Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं; येत्या विकेंडला मुंबईपासून फक्त 83 किमी असलेल्या या हिल स्टेशनला फिरून या

Horoscope Monday : धावळपळ वाढणार, काम अधिक करावे लागेल; 5 राशींच्या लोकांनी चुका टाळाव्यात, अन्यथा...

SCROLL FOR NEXT