Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

...म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार; कारण ?

आज झालेल्या खातेवाटपामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सगळ्यात पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात घडलेल्या अनेक धक्कादायक घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार असं सर्वांना वाटत असताना भाजप श्रेष्ठींनी नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

शिवाय जरी मुख्यमंत्री शिंदे असले तरी सर्व अधिकार उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. अशी टीका विरोधक करत असतात. अशातच आज राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

मात्र, या खातेवाटपामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राला लाभलेले सगळ्यात पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार असल्याचं बोललं जात आहे. कारण राज्यातील क्रमांक एकची खाती आणि आर्थिक नाड्या फडणवीस ह्यांच्या हातात आहेत.

पाहा व्हिडीओ -

आज झालेल्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग मुख्यमंत्र्यांकडे असणार आहेत.

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत. त्यामुळे फडणवीसांकडील खाती ही महत्वाची असून ते पॉवरफुल उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

तर शिंदे सरकारमधील इतर मंत्र्यांना देण्यात आलेली खाती पुढीलप्रमाणे -

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित-

आदिवासी विकास

गिरीष महाजन-

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील-

पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे-

बंदरे व खनिकर्म

संजय राठोड-

अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-

कामगार

संदीपान भुमरे-

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत-

उद्योग

प्रा.तानाजी सावंत-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण -

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार -

कृषी

दीपक केसरकर -

शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे -

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई -

राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा-

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

SCROLL FOR NEXT