Maharashtra Political News Updates : Devendra Fadnavis
Maharashtra Political News Updates : Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात पुन्हा नवा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नवे मुख्यमंत्री असतील आणि मी मंत्रिमंडळाबाहेर राहून माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी जाहीर भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. मात्र, आता या राजकीय घडामोडींमध्ये नाट्यमयरित्या ट्विस्ट आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री व्हावं, असे भाजपच्या केंद्रातील नेतृत्वानं सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायला हवं, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP national president J. P. Nadda) यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळावा, अशी मी त्यांना वैयक्तिकरित्या विनंती करतो आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानंही त्यांना तसे सांगितले आहे, असेही नड्डा म्हणाले.

हे देखील पाहा -

त्यानंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही याबाबत माहिती दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

अमित शहांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, 'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राप्रती त्यांची निष्ठा आणि सेवाभावी स्वभावाची ओळख करून देत आहे. याकरिता मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.'

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Fire: उल्हासनगरमध्ये अग्नितांडव; जे. के. ऑर्किड इमारतीला भीषण आग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

Today's Marathi News Live : उल्हासनगरमध्ये स्टार्टर अकाउंटच्या कार्यालयाला लागली भीषण आग

चटईवर झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT