Devendra Fadnavis And Uddhav thackeray
Devendra Fadnavis And Uddhav thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

'संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर...'; उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आज शिवसेनेची स्वाभिमान सभा संपन्न झाली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) उपस्थित शेकडो शिवसैनिकांना संबोधित केले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासहित इतर मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या औरंगाबादमधील जल आक्रोश मोर्चावरही सडकून टीका केली. आता उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षानंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics News)

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही.पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही. त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...!. माझे पुन्हा सवाल आहेत,शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार?. पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?'.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, असो,संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती.पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे'.

दरम्यान, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'आता चिरडण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांची राहिली नाही. पाऊस तोंडांवर आहे, डास आधी होणार नाही याची काळजी घ्या. मग चिरडण्याची भाषा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसाठी हिंदुत्व आणि सत्तांतर आता कालबाह्य विषय झाले आहेत. त्यामुळे नामांतरावर ते असं बोलत आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं जातं यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रश्न सोडवावे लागतात.केंद्र सरकारची जल जीवन योजना राबवण्यात आली आहे, जल जीवन निधी का वापरला नाही याचा उत्तर द्यावे. मग पाण्यावर बोला, अशी टीका प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेला जाग, मुंबईतील १०२५ अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

Ulhasnagar News : उपचारासाठी नेत असल्याचे सांगून ५ महिन्याच्या बालकाचे अपहरण; दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

Relationship Tips : बाळाला जन्म देण्याआधी 'या' चुका टाळा; नंतर होईल पश्चाताप

SCROLL FOR NEXT