Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : विरोधकांचा खोटा उत्साह, बजेटमुळे संपला; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात, VIDEO

Devendra Fadnvis : 'विरोधकांचा खोटा उत्साह, बजेटमुळे संपला आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात अंतरिम संकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शेतकरी ते महिलांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'विरोधकांचा खोटा उत्साह, बजेटमुळे संपला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलं. अजित पवारांच्या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी टीका केली होती. विरोधकाच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आज अजित पवार यांचं अभिनंदन करतो. आज त्यांनी प्रगतशील सर्वसमावेशक बजेट सादर केलं. शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सर्व घटकांना समर्पित असा अर्थसंकल्प आहे'.

'उद्धव ठाकरे म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे. पण हा मायबापांचा अर्थसंकल्प आहे. आता विरोधीपक्ष बोलत होते. त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता. चेहरे उतरलेले होते, केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास करणार आहे. जे जे कबूल केलं आहे. ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करून दाखवून देऊ. हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीचा नाही, असे फडणवीस म्हणाले.

'विरोधक आधीच लिहून आणतात की, काय बोलयाचं आहे. त्यांचा उत्साह खोटा होता. निवडणुकीत निकालातून जो आला होता. तो आजच्या बजेटमुळे संपला आहे,असेही फडणवीस पुढे म्हणाले.

पहिल्यांदा दिंडीला निधी दिल्याने त्यांना पोटदुखी; मुख्यमंत्र्यांचा निशाणा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे यांनी अर्थसंकल्पावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एकट्याच्या योजना नाहीत. या सरकारच्या योजना आहेत. जनतेच्या योजना आहेत. जनताच विरोधकांचा पर्दाफाश करेल. पहिल्यांदा दिंडीला आम्ही निधी दिला. यामुळेच पोटदुखी होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT