Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

TATA एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना माहिती होतं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

टाटाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारावा असं वातावरण नाही, असं मी म्हटलं होत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत यावरुन विरोधकांना सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांनीही हे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परराज्यात गेल्याचा आरोप केला आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ((Devendra Fadnavis) ) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. टाटा एअरबस प्रकल्प बाहेर जाणार हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती होतं.

टाटाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारावा असं वातावरण नाही, असं मी म्हटलं होत. आता त्यापलीकडे जाऊन सांगतो की, Tata एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार असं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरी जाऊन टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. साम टीव्हीच्या सामर्थ्य महाराष्ट्राचे - वेध भविष्याचा - मंथन विकासाचे या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)

उद्योग वाचवण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले आहेत. सॅफ्रन प्रकल्प एक वर्षांपूर्वी बाहेर गेला होता. अलिकडच्या काळात केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करत असते. जो कांगावा केला जातो तो चुकीचा आहे. 100 उद्योगांच्या मागे जेव्हा आपण लागतो तेव्हा 10 उद्योग येतात. येत्या काळात महाराष्ट्रात मोठे उद्योग येतील. उद्योग जेव्हा येतात तेव्हा ते तिथले वातावरण बघत असतात. जेव्हा तुमच्या राज्यात गृहमंत्री जेलमध्ये जातात आणि मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटक ठेवली जातात, तेव्हा उद्योग कसे येणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT