काँग्रेसमधूनही काही लोक येऊ शकतात; सामच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

'राज्यात असा एक समज आहे. काँग्रेसमधून काही लोक येऊ शकतात. असे मी दर्शवत नाही, असा मोठा गोफ्यस्पोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv
Published On

रश्मी पुराणिक

Devendra Fadnavis News : 'राज्यात असा एक समज आहे. काँग्रेसमधून काही लोक येऊ शकतात. असे मी दर्शवत नाही. मात्र, असं राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात त्यांची जागा आहे. फक्त आता त्यांच्याशी बोलणं सुरू नाही, असा मोठा गोफ्यस्पोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
TATA एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना माहिती होतं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत साम टीव्हीच्या 'सामर्थ्य महाराष्ट्राचे - वेध भविष्याचा - मंथन विकासाचे' या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच उपमुख्यमंत्रिपद कसे मिळाले, याबाबतही फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'मी मुख्यमंत्री होणार नाही मला माहीत होते. पण माझ्यासाठी धक्कादायक निर्णय म्हणजे मी उपमुख्यमंत्री होणार. सरकारच्या बाहेर राहून चालत नाही. त्यामुळे मला नंतर वाटलं वरिष्ठांनी घेतलेला निर्णय योग्य होता'.

राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) भाष्य करताना फडवणीस म्हणाले, 'एक वेळ अशी होती, ज्यावेळी राष्ट्रवादी आमच्या सोबत येण्यास इच्छुक होती. पण आमचे वरिष्ठ म्हणत होते की, तुम्ही सोबत या, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. राज्यात अशी एक समज आहे की, काँग्रेसचे (Congress) काही नेते येऊ शकतात. पण राजकारणात काहीही अशक्य नाही. पण आता चर्चा सुरू नाही'.

Devendra Fadnavis
TATA एअरबस प्रकल्प गुजरातला जाणार हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना माहिती होतं; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. 'तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणार व्यक्ती, तुमच्यासोबत निवडून आलेला व्यक्ती हा थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो त्यावेळी राजकारणात जीवंत राहून त्याला ते परत करावं लागतं. नाहीतर तुम्ही राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे. पण तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेत असेल तर बेईमानाला जागा दाखवलीच पाहिचे. त्यामुळे होय मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com