Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : उल्हासनगरात भाजप आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणाची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Firing On Mahesh Gaikwad In Ulhasnagar: कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BJP Mla Ganpat Gaikwad Firing

मुंबईच्या उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात २ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली (Firing On Mahesh Gaikwad In) आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस ठाण्यातच हा सगळा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Political News)

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात आरोप प्रत्यारोप

महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती. शुक्रवारी रात्री मात्र पुन्हा दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले (Firing On Eknath Shinde Group Leader) होते.

महेश गायकवाड गंभीर जखमी

महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकापाठोपाठ एक अशा ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील यावेळी गोळी लागली.

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड (BJP Mla Ganpat Gaikwad) यांना ताब्यात घेतलंय. ते पुढील तपास करत आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर कल्याण (Kalyan) पूर्वेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT