Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : देवाभाऊ नाव कसं पडलं? देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च केला नावाचा उलगडा

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या देवाभाऊ या नावाविषयी मोठं भाष्य केलं आहे. देवाभाऊ नाव कसं पडलं, याच्याविषयी फडणवीसांनी मोठा खुलासा केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या टोपणनावाची जोरदार चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना अनेक जण अजितदादा अशी हाक मारतात. तर अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'भाई' म्हणून संबोधतात. तसेच देवेंद्र फडणवीसांना अनेक जण देवाभाऊ या नावाने हाक मारतात. राज्यातील विविध भागातील बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा 'देवाभाऊ' म्हणून उल्लेख पाहायला मिळत आहे. हेच 'देवाभाऊ' नाव कसं पडलं, याविषयी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे.

'देवाभाऊ' या नावाचा उलगडा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'देवाभाऊ हे नाव आहे. ते ८ -१० वर्ष इंटरनेट कम्युनिटीमधलं नाव आहे. ते सगळे मला देवाभाऊ म्हणतात. ते आता बाहेर आले. आता जनरल झालं. आता आमचे कार्यकर्ते वापरायला लागले. मला पण आपुलकी वाटली. मी याबद्दल पण कुणाला काही बोललो नाही. जनतेशी नाते प्रस्थापित होतं. म्हणून मी कोणाला टोकलं नाही'.

लाडकी बहीण योजना आणली आणि तिजोरी रिकामी केली, या विरोधकांच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'मला गंमत वाटते. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पैसे मिळणार नाहीत काँग्रेस म्हणाले. आता म्हणाले हे काढून घेतील. त्यांचे लोक कोर्टात गेले. कोर्टानेही नकार दिला. आता ते लोक म्हणतात की आम्ही यापेक्षा जास्त देऊ. मी आपल्याला सांगतो. ऑफ बजेट कुठलीही घोषणा केली नाही. बजेटमध्ये किती पैसा येणार, कसा जाणार. एकही घोषणा बजेटबाहेरची नाही. पगाराची व्यवस्था आहे. लाडक्या बहिणीची व्यवस्था आहे'.

'राज्यात १०० जागा गाठणे शक्य होईल. लोकसभेचा अपवाद सोडला तर गेल्या २०-२५ वर्षांत स्ट्राईक रेट चांगला होता. आमचा स्टाईक रेट चांगला असतो. यावेळी ग्राउंडची परिस्थिती दिसते. सर्वात जास्त स्ट्राइक रेट सर्वाधिक असणार आहे. आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. महायुतीच्या सर्वात जास्ता आल्या पाहिजेत. आमचं एकच ध्येय आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT