मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळालं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याच अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं, याची १३ मुद्द्यांची यादी देवेंद्र फडणवीस यांनी वाचली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विरोधकांची प्रतिक्रिया आधीच ठरलेली आहे. मी आकडे सांगतोय म्हणून ते उत्तर देऊ शकत नाही. ते फक्त नरेटिव्ह सेट करतात. पी चिदंबरम यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केले पाहिजे. दोन्ही बाजूने बोलणारे ते लोक आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सकाळीच ठरवलं होतं की, काय बोलायचं आहे. असं असेल तर विजय वड्डेटीवार यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांना माहित आहे की, आपण सत्तेत येणार नाही. आमचा अर्थसंकल्प वड्डेटीवारांना देखील आवडला आहे'.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,' यंदा संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कोव्हिडनंतर जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडत होती. त्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेने दाखवलेली 8.2 टक्के वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दाखवणारी आहे. उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली. सामाजिक कल्याणासाठीच्या योजनांसाठी 12 टक्के अधिकची गुंतवणूक आहे. जीडीपीच्या 7.8 टक्के गुंतवणूक झाली आहे. बँकांचे NPA केवळ 2 टक्क्यांवर आहे'.
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.