Devendra Fadnavis On Rahul Gandhi Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : 'दुसऱ्या देशात जाऊन...'; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis : बाहेर जाऊन आपल्याच देशाची निंदा करणारा नेता असू तरी शकतो का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis News in Marathi

'भारताचा जगात गौरव वाढतो आहे. मात्र, राहुल गांधी विदेशात जाऊन चीनचे कौतुक करीत होते. बाहेर जाऊन आपल्याच देशाची निंदा करणारा नेता असू तरी शकतो का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते राजस्थान भाजपच्या वतीने आयोजित परिवर्तन यात्रेत बोलत होते. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजस्थान भाजपाच्या वतीने परिवर्तन यात्रेला हजेरी लावली. या यात्रेत भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजस्थान ही महाराणा प्रताप यांची पवित्र भूमी आहे. पण, गहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने राजस्थान हा अत्याचार आणि भ्रष्टाचारात क्रमांक एकवर आणून ठेवला'

'आज राजस्थान सरकार केंद्र सरकारकडून निधी घेते. केंद्राच्या याच निधीचा भ्रष्टाचार करतात. मग केंद्र सरकारवरच टीका करतात. गहलोत यांनी राजस्थानला पहिल्या क्रमांकावर आणले. पण, अत्याचार आणि भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आणले. महाराणा प्रतापांच्या भूमीवर हे अजिबात शोभनीय नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार संपविण्याचे काम केले. अनेक योजन राबविल्या. योजनेतील पैसे आता गरिबांच्या खात्यात जात आहे. भारताला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदींनी केले. यामुळे रोजगार वाढत आहे. लोकांच्या हाती पैसा येतो आणि लोककल्याणासाठी सुद्धा सरकारच्या हाती पैसा येतो. पायाभूत सुविधांच्या कामाला गती येते. आज जगात भारताचा गौरव वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT