Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: अनेकांच्या वडिलांची स्मारकं, मग शेतकऱ्यांबाबत छोटं मन का, फडणवीसांचा विधानसभेत उद्विग्न सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र, तरीही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणं सुरुये, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडलं. तसेच, अनेकांच्या वडिलांची स्मारकं करत आहोत, मग शेतकऱ्यांबाबत छोटे मन का, असा संतप्त प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला (Devendra Fadnavis Criticize Mahavikas Aghadi Over Farmers Suicide In Assembly).

आज देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अर्थसंकल्पावर भाषण केलं. विधानसभेत यावेळी त्यांनी राज्य सरकारव टीका करत या अर्थसंकल्पामध्ये केंद्राचा आधार घेतला आहे, तसेच या जुन्याच योजना असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा केली, मात्र मी ती चार वर्षापूर्वी ही संकल्पना व्यक्त केली होती. तेव्हाच्या विरोधकांनी माझी खिल्ली उडवली होती, अस होऊ शकत नाही अस म्हणाले होते. मात्र आज ते होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसेच, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नही लावून धरला.

आज सुल्तानी संकटाने शेतकरी आत्महत्या करताहेत - फडणवीस

"विकासाची पंचसूत्री सांगत असताना तुम्ही कृषीसंदर्भात बोलला. मात्र, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. अनेकवेळा आत्महत्या (Farmers Suicide) अस्मानी संकटाने होतात, आज मात्र सुल्तानी संकटाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सूरज जाधव सारखा शेतकरी व्हिडीओ तयार करतो आणि सांगतो की माझं विजेचं कनेक्शन कापलं गेलं, या राज्यात शेतकरी म्हणून राहून काहीही अर्थ नाही, सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की, एक सुरज जाधव गेल्यानंतर किमान त्याची लाज वाटून शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापणे बंद होईल. पण, दुर्दैवाने आजही ते झालेलं नाही", असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांबाबत छोटं मन का, फडणवीसांचा सवाल

"वारंवार ऊर्जामंत्री सांगतात की वीज मंडळ तुमच्या काळात तोट्यात गेलं. माझा पहिला प्रश्न म्हणजे राज्य चालवायचं कोणासाठी, शेतकऱ्यांसाठी ना. मग समजा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी दोन पैसे जास्तीचे द्यावे लागले तर काय त्रास होतोय. अनेकांच्या वडिलांची स्मारकं आपण करतोय, मी बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलत नाहीये, ते मोठे आहेत. ज्यांची स्मारकं झाली तेही मोठे होते. पण, त्यांची स्मारकं करताना आपण असा विचार नाही केला की राज्याजवळ पैसे नाहीयेत. तेही महत्त्वाचं होतं. अनेक कामांना पैसे दिले. या अर्थसंकल्पात तुम्ही जी कामं राज्याच्या अर्थसंकल्पात बसत नाहीत त्यांनाही पैसे दिले आहेत. मग, शेतकऱ्यांबाबत इथकं छोटं मन का?", असा संतप्त सवाल यावेळी फडणवीसांनी विधानसभेत केलं.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांमध्ये घातलं अवकाळी पावसानं थैमान?

Pune Traffic News : पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मेट्रोच्या कामामुळे 'या' भागातील रस्ते राहणार बंद

Nashik Lok Sabha Voting LIVE : नाशिकमध्ये मतदान सुरू होण्याआधीच EVM बंद, कर्मचाऱ्यांची तारांबळ

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

SCROLL FOR NEXT