Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकट्याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर भाष्य केलं.

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही

मुंबई : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची अपडेट दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अडीच वर्षांत विकासाने गती घेतली आहे. या गतीला पुढेच नेऊ. त्या गतीने महाराष्ट्र पुढे जाईल. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र आग्रही राहील. मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले आहे. आता आमचे रोल बदलले असले तरी दिशा तीच राहील. आमचा समन्वय तोच राहील. कुठेही वेगळेपण पाहायला मिळणार नाही'.

'आम्ही तिघांनीही सगळे अधिकारी आहेत, मागच्या काळात पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि मी आलो. तेव्हा ५० ओव्हरची मॅच होती. त्यानंतर अजित पवार आले, त्यावेळी टी २० मॅच झाली. आता टेस्ट मॅच खेळायची आहे. आता नीट पायाभरणी करत राज्याला पुढे न्यायचं आहे. आता मी अधिकाऱ्यांना सांगितलं की यापुढे चांगली धोरण, निर्णय घेत राज्याची प्रगती करायची आहेत, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

'आम्ही निर्णय घेतलेले आहेत, ते पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायची आहेत. सगळी आश्वासने पूर्ण करायची आहेत. अडचणी अनेक येतात. त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत मार्गक्रमण करू असा विश्वास देखील व्यक्त करतो. आपलं सहकार्य असावं अशी विनंती करतो, असे फडणवीसांनी सांगितले.

'राज्य सरकारचं ७,८,९ डिसेंबर रोजी अधिवेशन असेल. तसा प्रस्ताव राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना ‌पाठवला आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करु. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. खातेबदल जास्त काही होईल असं वाटत नाही. थोडेफार खाते बदल होईल. आघाडी सरकारमध्ये खातेवाटपाबाबत चर्चा करावीच लागते. त्या चर्चेनंतर खातेवाटप केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT