Devendra Fadnavis News, Deepali Sayyad News Saam TV
मुंबई/पुणे

सूर्याकडे पाहून थुंकणाऱ्यांच्या तोंडावरच थुंकी पडते; फडणवीसांचा शिवसेना नेत्यावर हल्लाबोल

'अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : 'सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यांमुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.' अशी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर केली आहे. (Devendra Fadnavis News)

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे जयंती सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) या जयंती सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रम स्थळी जाण्यापासून रोखलं आहे या पार्श्वभूमिवर फडणवीस पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्यावर टीका केली.

हे देखील पाहा -

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, 'परकीय आक्रमकांनी आमची मंदीर उद्धवस्त केली, ती पुन्हा उभारण्यात काम अहिल्याबाईंनी केलं. त्यांच्या जयंतीला लाखो लोक येतात. मात्र, सरकारी यंत्रणा वापरून जयंती कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम शिंदे अहिल्याबाई यांचे थेट वंशज आहेत त्यांना रोखण्यात आलं. गोपीचंद पडळकर यांना अडवले हे योग्य नाही. हा जयंती सोहळा राष्ट्रीय पर्व असते, तो सर्वांनी मिळून साजरा करायला हवा असं फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी दीपाली सय्यद यांनी मोंदीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, जे लोक सूर्याकडे पाहून थुंकतात त्यांच्याच तोंडावर ती थुंकी पडते, तसंच त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे त्यांमुळे थुंकी त्यांच्या तोंडावर पडेल असं फडणवीस म्हणाले.

दीपाली सयद्द यांनी भाजपला पुन्हा डिवचलं -

दीपाली सयद्द या भाजपवर आक्रमक टीका करत असतात असंच त्यांनी आज एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे, 'अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र! असं ट्विट सय्यद यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

SCROLL FOR NEXT