Devendra Fadnavis Raj Thackeray on World Obesity Day
Devendra Fadnavis Raj Thackeray on World Obesity Day  Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : लठ्ठपणाचे दोन प्रकार, देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंनी संदर्भासहित दिली उदाहरणे; मुलाखतीचा VIDEO बघा

Satish Daud

देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलांमध्ये लहान वयातच लठ्ठपणाचे विकार दिसून येत आहेत. त्यामुळे लठ्ठपणाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत मुलाखत दिली.

मुलांचा लठ्ठपणा बालपणातच कसा दूर करता येईल. पालकांनी काय काळजी घ्यायला हवीत. तसेच सरकार त्यावर काय उपाययोजना करीत आहेत. यासंदर्भातील माहिती यावेळी फडणवीस आणि राज ठाकरे यांनी दिली. या मुलाखतीतून त्यांनी लठ्ठपणाचे दोन प्रकारही सांगितले.

"जागतिक आरोग्य संघटनेनं लठ्ठपणा हा आजार असल्याचं घोषित केलं आहे. मात्र, आजही या आजारावर सरकारी रुग्णालयात विशेष उपचार केले जात नाहीत. पण आपण लठ्ठपणाचे प्रकार हळूहळू संपवत आहोत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लठ्ठपणा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन प्रकार संदर्भासहित सांगितले. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये मुलांचा लठ्ठपणा वाढतोय. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेमध्ये यावर उपचार घ्यायला फायदा होत आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, "नुकताच लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला. त्यानंतर सरकारने प्रत्येक ठरवलं की, प्रत्येक शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक करायची. या शिक्षकांना लहान मुलांमधील लठ्ठपणा कसा कमी करता येईल, याबाबत ट्रेनिंग द्यायची. देशभरात असा प्रोग्राम प्रोग्राम हाती घेणे सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले.

"आज अनेक मुले मैदानात खेळण्यासाठी जात नाहीत. घरात बसून मोबाइलवर गेम खेळत बसतात. त्यामुळे आम्ही आता प्रत्येक शाळांमध्ये पीटीचा तास सुरू केलेला आहे. तसेच मैदान नसलेली शाळा सुरू करता येणार नाही असा नियमही आम्ही केला आहे", अशी माहिती फडणवीसांनी दिली.

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लठ्ठपणा आजारासंदर्भात महत्वाचे भाष्य केले. लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही. डॉक्टरांनी यासाठी काहीतरी शोधलं पाहिजे. बाहेरचे फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाढलंय. जे जिभेला चांगलं ते वाईट असं झालं आहे", असं राज ठाकरे म्हणाले.

"जपानमधील शाळांमध्ये मुलांना डबे आणू दिले जात नाहीत. त्यांना शाळेतच जेवण बनवलं जात. शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी पण चायनीजची ऑर्डर दिली", अशी कोपरखळी राज ठाकरेंनी मारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांचा 'गुलाबी साडी'वर जबरदस्त डान्स, पाहा!

Lok Sabha Speaker Elections Live : मोठी बातमी! ओम बिर्ला यांची पुन्हा लोकसभा अध्यक्षपदी निवड

Pandharpur Video: पंढरपुरात दर्शन रांगेत गोंधळ; आषाढीपूर्वी दर्शन व्यवस्था कोलमडली!

Esha Gupta: ईशा गुप्ताचं ब्लॅक आऊटफिटवर फोटोशूट; सिझलिंग लूकने वाढवला इंटरनेटचा पारा

Bank Recruitment: बँकेत नोकरीची मोठी संधी ; ९००० हून अधिक पदे, IBPS द्वारे भरती, शेवटची तारीख कधी?

SCROLL FOR NEXT