MUMBAI TO GET DEVABHAU TAXI SERVICE | AFFORDABLE ALTERNATIVE TO OLA, UBER AND RAPIDO Saam Tv
मुंबई/पुणे

Devabhau Taxi : मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रवाशांच्या सेवेत येणार 'देवाभाऊ टॅक्सी', युवकांना मिळणार रोजगार

Mumbai Devabhau Taxi News : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या सेवांना पर्याय म्हणून ‘देवाभाऊ टॅक्सी सेवा’ लवकरच सुरू होणार आहे. कमी दरात प्रवासासह हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Alisha Khedekar

  • देवाभाऊ टॅक्सी सेवा’ मुंबईत लवकरच सुरू होणार

  • ही सेवा ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या खासगी कॅब सेवांना पर्याय ठरणार आहे

  • पहिल्या टप्प्यात 2,000 ते 5,000 टॅक्सी सुरु करणार

  • मुंबई बँकेमार्फत 3,000 युवकांना टॅक्सी उपलब्ध करून रोजगार दिला जाणार

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या खासगी कॅब सेवांना पर्याय म्हणून लवकरच ‘देवाभाऊ टॅक्सी सेवा’ सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना कमी खर्चात प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा मिळण्यासोबतच हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, ‘भारत टॅक्सी’च्या धर्तीवर मुंबई आणि एमएमआर परिसरात ‘देवाभाऊ सेवा सहकारी टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी सेवा’ सुरू केली जाणार आहे.

यासंदर्भात चर्चा पूर्ण झाली असून वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी आवश्यक धोरण निश्चित केले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एमएमआर परिसरात 2,000 ते 5,000 टॅक्सी सुरु करण्यात येतील. दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबई बँकेच्या माध्यमातून किमान 3,000 तरुणांना टॅक्सी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी अडाणी विमानतळ व्यवस्थापनासह विविध हॉटेल्स आणि संस्थांशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. टॅक्सी मिळणाऱ्या युवकांना आवश्यक परवान्यांसह व्यवसायाची संधी दिली जाणार आहे. या प्रकल्पामुळे थेट 3,000 तरुणांना रोजगार मिळेल. आता ही सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Transmissible cancer: धक्कादायक संशोधन! माशांमध्ये पसरतोय दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर; माणसांसाठी किती धोकादायक?

30 दिवस नाश्ता केला नाही तर काय होईल? शरीरावर होणारे ४ परिणाम जाणून घ्या

Ragi For Diabetes : रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

Pune : मुलीच्या पोटात दुखू लागल्याने उघडकीस आला भयंकर प्रकार! ६० वर्षांच्या नराधमाचे सख्ख्या बहिणींवर अत्याचार

SCROLL FOR NEXT