ajit pawar jayant patil
ajit pawar jayant patil 
मुंबई/पुणे

आता 'ही' मागणी मान्य व्हावी : अजित पवार; 'हुकूमशाह' झुकले : पाटील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. झालेली चूक सुधारत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी असलेले कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनीही पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतल्याचे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. योग्य निर्णया घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींचे आभार मानले. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे देखील पवार यांनी अभिनंदन केले. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असे ही पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले असे म्हटलं. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असे त्यांनी नमूद केले.

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.

ऐतिहासिक लढाईचे यश : सतेज पाटील

काॅंग्रेसचे आमदार काेल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तिन्ही काळे कृषी कायदे मागे घेणे हे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढाईचे यश आहे असे म्हटलं. आगामी निवडणुकामधील फायद्यासाठीच हा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट असले तरी या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा प्रश्न ट्विट करुन त्यांनी विचारला आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Heat Wave Update: सूर्य आग ओकतोय! देशातील अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसवर

Who Is KL Sharma: काँग्रेसचे निष्ठावान, सोनिया गांधींचे विश्वासू.. अमेठीतून स्मृती इराणींना टक्कर देणारे के. एल शर्मा कोण?

Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

SCROLL FOR NEXT