Devendra Fadanvis on Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadanvis News: उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातले खरे गद्दार, फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, 'तुम्हाला गद्दार...'

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे खरे गद्दार तुम्हीच आहात, दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे खरे गद्दार तुम्हीच आहात, दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. महाराष्ट्रासोबत खरी गद्दारी तुम्हीच केली. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांची फोटो दाखवून मतं मागितली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, असंही फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

कल्याण येथील फडके मैदानात आज देवेंद्र फडणवीस यांनी जंगी सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आज शिवसेनेचा वर्धापन दिन या निमित्त बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देतो. आज राज्यात दोन कार्यक्रम आहे. एक ज्यांनी शिवसेना वाचवली त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तर दुसरा कार्यक्रम ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे, असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

२०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी मत मागताना युतीचं सरकार यावं म्हणून मतं मागितली. पण निकालानंतर खुर्चीसाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. खऱ्या अर्थाने गद्दारी कुणी केली तर उद्धव ठाकरे यांनी केली. तुम्हाला दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही, तुम्हीच महाराष्ट्राचे खरे गद्दार आहात, असा घणाघात फडणवीसांनी केला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेना जोपासण्याचं काम केलं. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाही तर, भाजपसोबत मत मागितली होती. म्हणून ते आमच्यासोबत आले, असंही फडणवीस म्हणाले. मोगलांना जसे संताजी धनाजी दिसायचे तसे आता मोदीजी आणि अमित शहांचे नाव घेतलं. तर हीच अवस्था उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली. असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

“उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ते काही भाषण होतं का? त्याला भाषण म्हणायचं का? ती ओकारी होती. मी असे शब्द वापरत नाही पण मला वापरण्यासाठी तेच मजबूर करत आहेत. यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मोदीजी आणि अमित शाहच दिसत आहेत.” असं म्हणत उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे. (Maharashtra Political News)

उद्धव ठाकरे तुम्ही खोक्यांचे वर्ष बोलतात तुमचे अडीच वर्ष कुंभकर्णाचे होते. अडीच वर्षात दोन वेळा मंत्रालयात गेले. हे मी नाही त्यांचे नेते शरद पवार बोलत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. ज्यावेळी नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याने जेलमध्ये पाठवले, तेव्हा तुम्ही त्यांचा राजीनामा घेवू शकला नाही, असा घणाघातही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT