Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: कोरोनानंतर आता डेंग्यूच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ

कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी होतं असताना आता मुंबईत साथीच्या आजारांचे संकट वाढताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाचे Corona संकट काही प्रमाणात कमी होतं असताना आता मुंबईत Mumbai साथीच्या आजारांचे संकट वाढताना दिसून येत आहे. आता पावसाळी आजार म्हणजेच डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरत चालली आहे. जुलैच्या तुलनेत मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास चौपट पटीने वाढली आहे.

हे देखील पहा-

ऑगस्टमध्ये मुंबईत डेंग्यूचे १३२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मान्सून संबंधित आजारांवरील अहवालात म्हटले आहे.

"पावसाच्या ऋतूमध्ये म्हणजेच Monsoon ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने डासांची Mosquitoes उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. डास चावू नये म्हणून बेड नेट, खिडकीचे पडदे, योग्य कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो." लोक स्व-औषधांवर अवलंबून राहू नये. ताप, डोकेदुखी, पुरळ, स्नायू आणि सांधेदुखीचा इतिहास असल्यास त्वरित उपचारांची शिफारस करण्यात आली आहे कारण डेंग्यूमुळे गुंतागुंत होते आणि मृत्यूचा धोका असतो, असे नागरी संस्थेने सांगितले.

दरवर्षी, मुंबईत सुमारे 5,500 डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण नोंदवले जातात, जे सर्वाधिक जून ते ऑगस्ट दरम्यान नोंदवले जातात.

शहरात बदलते हवामान तसेच पाऊस हे वातावरण संसर्गजन्य रोग पसरण्यासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी डासांची पैदास वाढली आहे. यामुळे गेल्या ऑगस्ट august महिनाभरात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे तब्बल २८ रुग्ण होते. तर ऑगस्टच्या आकडेवारीनुसार ही संख्या आता १३२ वर पोहोचली आहे. जानेवारी ते ऑगस्ट डेंग्यू रुग्णांची संख्या एकूण २०९ झाली आहे. तर गेल्या वर्षी हे प्रमाण १२९ होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT