kalyan Saam Tv News
मुंबई/पुणे

Delivery boy: कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयचा प्रताप, कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर लावले स्टिकर्स

Kalyan Dombivli: डिलिव्हरी बॉयकडून लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नात, अनेकदा वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीत डिलिव्हरी बॉयनं वेगळीच शक्कल लढवलीय.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

डिलिव्हरी बॉयकडून लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नात, अनेकदा वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीत डिलिव्हरी बॉयनं वेगळीच शक्कल लढवली आहे. कारवाई टाळण्यासाठी दुचाकीच्या नंबरप्लेटवर स्टिकर लावून नंबर लपवण्याचा प्रकार उघडकीस आलाय. निलेश जगदाळे या तरुणाने या प्रकरणाचा व्हिडिओ तयार केला असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डिलिव्हरी बॉयकडून लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नात, अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असते. नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीतील डिलिव्हरी बॉयने वेगळीच शक्कल लढवली होती. नियम उल्लंघन झाल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी दुचाकीच्या नंबरप्लेटवर स्टिकर लावून नंबर लपवण्याचा प्रकार उघडकीस आलाय.

निलेश जगदाळे या तरुणाने या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून पोलिसांत तक्रार दाखल केली. या एका व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्या नजरेतून ही वाहने कशी सुटतात, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नंबर लपवलेल्या दुचाकीकडून एखादा अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार ठरणार? असा सवाल देखील उपस्थित होतोय.

अशा डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निलेश जगदाळे यांनी केला आहे .तर याबाबत कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी धक्कादायक बाब आहे , ही बाब उघडकिस आल्यानंतर कल्याण मधील डिलिव्हरी बॉयच्या गाड्या तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT