Eknath Khadse
Eknath Khadse Saam tv
मुंबई/पुणे

एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; ईडीने दिलेल्या नोटिसला हायकोर्टाने दिली स्थगिती

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ईडीने (ED) घर खाली करण्याची नोटिस दिली होती, या नोटिसला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली असल्याची माहिती एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी दिली.

मोहन टेकवडे यांनी ईडीला (ED) पत्र लिहून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरसंदर्भात कळवले आहे. दिल्ली हायकोर्टाने ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेवर आणि अडजुडीकटिंग अथोरिटीने दिलेल्या ऑर्डरवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना घर खाली करावे लागणार नाही. ईडीने एकनाथ खडसे (Eknath Khadse), मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याची नोटीस दिली होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

रोष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. या नोटिसमध्ये जप्त केलेली मालमत्ता खाली करण्याचे आदेश दिले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती. खडसेंच्या ११ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खडसेंना ३० मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव, लोणावळामध्ये खडसेंची मालमत्ता आहे. ही मालमत्ता खाली करण्याचे आदेश ईडीने दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT